सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 270 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 177 अहवाल निगेटिव्ह आले असून 93 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी 138 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना मुळे तिघांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
कोरोना चाचणीचे 51 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील एकूण रुग्ण संख्या आता 35 हजार 330 झाली आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 726 अॅक्टीव्ह कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 1 हजार 36 जणांचा आत्तापर्यंत कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील 32 हजार 568 जण आत्तापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.
आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माढा तालुक्यातील बेंबळे येथील 63 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मळेगाव येथील 70 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्यातील पांढरेवाडी येथील 60 वर्षिय महिलेचा समावेश आहे. ग्रामीण भागातील 12 हजार 91 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 3 हजार 125 जण सध्या इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुर्णेत भरधाव कारने दोघांना चिरडले