27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeसोलापूरसोलापूर शहर जिल्ह्यात १४ जणांचा कोरानाने मृत्यू

सोलापूर शहर जिल्ह्यात १४ जणांचा कोरानाने मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज नव्या 352 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. दहा जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत ग्रामीण भागातील कोरोना चाचणीचे 2 हजार 712 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2 हजार 363 अहवाल निगेटिव्ह आले असून 352 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज एकाच दिवशी 461 जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे त्या व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 25 हजार चोवीस झाली असून कोरोनामुळे आत्तापर्यंत 679 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या सहा हजार 276 जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 18 हजार 69 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना चाचणीचे 89 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.

आजच्या अहवालात मृत घोषित करण्यात आलेल्या दहा व्यक्तींमध्ये पंढरपुरातील वीरसागर नगर येथील 62 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्­यातील लवंगी येथील 74 वर्षिय पुरुष, बार्शी येथील 65 वर्षीय महिला, माळशिरस तालुक्­यातील माळेवाडी येथील 51 वर्षिय पुरुष, सांगोला तालुक्­यातील कोळा येथील 70 वर्षिय पुरुष, बार्शी तालुक्­यातील सासुरे येथील 72 वर्षीय पुरुष, पंढरपूर तालुक्­यातील जळोली येथील 55 वर्षीय पुरुष, पंढरपूर तालुक्­यातील कोर्टी येथील 80 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्­यातील खंडाळी येथील 70 वर्षीय, महिला माढा तालुक्­यातील कुर्डूवाडी येथील 66 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे.

तसेच सोलापूर शहरातील काही ठरावीक भागातच सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामध्ये उपमहापौर राजेश काठे यांच्या 24 नंबर प्रभागात सर्वाधिक 747 रुग्ण, शिवा बालटीवाला यांच्या 26 नंबर प्रभागात 626, आनंद चंदनशिवे यांच्या पाच नंबर प्रभागात 551 आणि देवेंद्र कोठे यांच्या सात प्रभागात 495 रुग्ण आढळले आहेत. आज 412 संशयितांची टेस्ट करण्यात आली असून त्यात 53 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. चार जणांचा मृत्यू झाला असून रेल्वे लाईन परिसरातील 17 वर्षीय तरुणीला 2 सप्टेंबरला अ‍ॅडमिट करुन 8 सप्टेंबरला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा श्­वास घेण्याचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी (ता. 29) तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, कोरोनामुळे तिचा मृत्यू झाला.

शहरात कर्णिक नगर, झोपडपट्टी क्र. एक (विजापूर नाका), अभिमानश्री, सरस्वती नगर, बेघर वसाहत (मजरेवाडी), हिरेहब्बू कॉम्प्लेक्­स (उत्तर कसबा), मुरारजी पेठ, न्यू पाच्छा पेठ, विजय रेसिडेन्सी, सत्यलक्ष्मी अपार्टमेंट (अशोक चौक), सैफूल, एसआरपी कॅम्प, विश्­वरय्या हौंिसग सोसायटी (गोकूळधाम), संयोग नगर, शिवगंगा नगर (जुळे सोलापूर), लक्ष्मी चाळ (मरिआई चौक), विकास नगर, सम्राट चौक, वसंत विहार, सरस्वती हाईट्स (नवीन आरटीओजवळ), सिध्देश्­वर कारखान्याजवळ, बंजारा सोसायटी (विजयपूर रोड), सिटीझन पार्क (आदित्य नगर), इंद्रधनू मरिआई चौक, गणेश नगर (नवीन आरटीओजवळ), विश्रांती चौक, बाळीवेस (उत्तर कसबा), न्यू पाच्छा पेठ, एमआयडसीसी (अक्­कलकोट रोड), गावठाण (शेळगी), अमर नगर (सोरेगाव), संची कॉम्प्लेक्­स (वामन नगर), रेल्वे लाईन्स (सात रस्ता), कोनापुरे चाळ (रेल्वे लाईन्स) याठिकाणी नव्या रुग्ण आढळले आहेत.

शहरात को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे सुरु असून कुटूंब माझी जबाबदारीचेही काम जोरात सुरु असतानाही रुग्णसंख्या आटोक्­यात आलेली नाही. दोन दिवसांत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कोनापुरे चाळ (रेल्वे लाईन्स) येथील 17 वर्षीय मुलीचा, सूत मिल (अक्­कलकोट रोड) येथील 75 वर्षीय पुरुषाचा, शंकर नगरातील 67 वर्षीय पुरुषाचा आणि बुधवार पेठ परिसरातील 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

नागपूरची अवस्था मुंबई-पुण्यासारखी होईल : आमदार कृष्णा खोपडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या