सोलापूर : ऊसतोड मजुरांना घेऊन निघालेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने नऊ बालकांसह १५ जण जखमी झाल्याची घटना मोहोळ येथील पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी घडली.
मंगळवारी सकाळी ९ वाजता मोहोळकडून टेंभुर्णीकडे ट्रॅक्टरमध्ये बसून निघालेले असताना मोहोळ येथील एका पेट्रोलपंपाजवळ ट्रॅक्टर पलटी झाला.
यात सर्वजण जखमी झाल्याने त्यांना मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात प्रथम उपचार करून छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शर्मिला वाण्या पाडवी (४ महिने), ज्योती वाण्या पाडवी (७), जितू वाण्या पाडवी (२), निशा पाडवी (१०), सेमीना भारत वळवी (३), कुलिया ललिया पाडवी (३ महिने), रीना वाण्या पाडवी (२५), फुनती गुनिया पाडवी (३०), सुमित्रा भारत वळवी (३०),
हेतल लुलिया पाडवी (२५), अजय सुंदर वळवी (७), सुनीता नरसिंग पाडवी (२२), हिरा वडवी (२५), अशमीर अस्मित वडवी (२) आणि हशिता अस्मित वडवी (५) अशी जखमींची नावे असून, ते सर्व नंदुरबार जिल्ह्यातील खानबरा गावातील राहणारे आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.