19.2 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeसोलापूर१६ बेकायदा खडी क्रशर बंद केल्याने खडी क्रशर चालकांत खळबळ

१६ बेकायदा खडी क्रशर बंद केल्याने खडी क्रशर चालकांत खळबळ

एकमत ऑनलाईन

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात परवानगी न घेता सुरू असलेले बेकायदेशीर १६ खडी क्रशर जिल्हा महसूल प्रशासनाने दोन दिवसांपासून बंद केल्याने खड़ी क्रशर चालकांत खळबळ उडाली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील येळगी, हुलजंती, लोणार, बोराळे, मंगळवेढा या भागात सुमारे १६ खडी क्रशर आहेत. खड़ी क्रशर काढण्यासाठी ग्रामपंचायत ना हरकत, सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी, आरोग्य विभाग, महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रदूषण महामंडळ, उद्योग विभाग यासह विविध परवानग्यांची गरज असते. खडी क्रशर चालू केल्यानंतर उत्पादित मालासाठी स्टॉक लायसन्स ठेवावे लागते. परंतु मंगळवेढा तालुक्यात या परवानगीकडे अनेक खड़ी क्रशर चालकांनी दुर्लक्ष करत व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरूच ठेवला होता.

चालू वर्षी तालुक्याला गौणखनिज महसूलचे साडेअकरा कोटीचे उद्दिष्ट असून गेल्या नऊ महिन्यात केवळ १ कोटी महसूल जमा झाला आहे. उर्वरित तीन महिन्यात साडेदहा कोटीचा महसूल गोळा करायचा आहे. खडी क्रशर बंद झाल्याने सर्व खड़ी कसर चालकांना परवानग्या घेण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्याचे समजते. सन २०२१-२२ मध्ये गौण खनिजाची चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्या २२६ लोकांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांनी दंड न भरल्याने त्याच्या ७-१२ उतार्‍यावर सुमारे २२ कोटीचा बोजा चढवला आहे.

जिल्हाधिकायांच्या आदेशाने ज्या खड़ी करार चालकांनी जमिनी एनए केल्या नाहीत. स्टॉक लायसन्स काढले नाही, त्यांचे खडी क्रशर बंद करण्यात आले आहेत. सर्व परवानग्या असणारे खडी क्रशर चालू राहणार आहे. असे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी सांगीतले.

अनेक खड़ी कशर चालकाकडे स्टॉक बुक रजिस्टर नसल्याने खड़ी क्रशर चालक रॉयल्टी चुकवून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत आहेत. सध्या येथील अनेक खडी क्रशर चालकाकडे ‘एनएची परवानगी नाही, स्टॉक लायसन्स नसल्याने जिल्हा महसूल प्रशासनाने गेल्या दोन आहेत. दिवसापासून तालुक्यातील १६ खडी क्रशर बंद केले आहेत.

खड़ी क्रशर चालकाने वेळेवर रॉयल्टी भरणे आवश्यक रॉयल्टी न भरल्याने यापूर्वी अनेक खड़ी क्रशर चालकांना लाखो रुपयांचा दंड केला होता. परंतु हा दंड न भरल्यामुळे संबंधित खड़ीक्रशर चालकाच्या ७/१२ उतार्‍यावर लाखोचा बोजा चढविण्यात आला आहे.सातबारा उताऱ्यावर लाखोंचा बोजा असतानाही अनेक खड़ी क्रशर चालकांनी जादा माल उत्पादित करून नॉमिनल रायल्टी भरल्याचे दाखवले

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या