32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeसोलापूरशहरात १९ तर ग्रामीणमध्ये १२१ कोरोना पॉझिटीव्ह

शहरात १९ तर ग्रामीणमध्ये १२१ कोरोना पॉझिटीव्ह

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर शहरात बुधवारी कोरोनाचे नवे 19 रुग्ण आढळले असून यामध्ये 9 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे. उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 45 इतकी आहे. मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 373 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 357 निगेटीव्ह आहेत. 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9325 असून एकूण मृतांची संख्या 520 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 595 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8210 इतकी आहे

साबळे यूपीएससी जवळ, भवानी पेठ परिसरातील अज्ञात व्यक्ती, आशा नगर एमआयडीसी ,संकेत ठोंबरे नगर वसंत विहार, गोंधळी वस्ती,स्वागत नगर कुमठा नाका, अंत्रोळीकर नगर भाग नंबर 2 ,ओंकार हौसिंग सोसायटी मजरेवाडी, निर्मिती विहार, गोंडे नगर, टिळक चौक उत्तर कसबा, विजयालक्ष्मी नगर नई जिंदगी, सर्वोदय अपार्टमेंट वसंत विहार, गंगाधर हौसिंग सोसायटी या परिसरातील व्यक्ती बाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे

तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे यामध्ये भवानी पेठ परिसरातील अनोळखी व्यक्ती मृत असून ते 52 वर्षाचे पुरुष आहेत .19 ऑक्टोंबर रोजी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान 20 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता त्यांचे निधन झाले. दुसरी व्यक्ती बसवेश्वर नगर परिसरातील 69 वर्षाचे पुरुष असून तिसरी व्यक्ती धोंडीबा वस्ती परिसरातील गैबी नगर मधील 56 वर्षाचे पुरुष आहेत
बुधवारी ग्रामीण भागातील तब्बल 121 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 77 पुरुष तर 44 महिलांचा समावेश होतो. बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 251 आहे. बुधवारी 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूण 1763 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1642 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 29 हजार 428 इतकी झाली आहे. यामध्ये 18,077 पुरुष तर 1171 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 852 जणांचा मृत्यू झाला आहे यात 605 पुरुष तर 247 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 312 आहे .यामध्ये 2 हजार 434 पुरुष तर 878 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 25 हजार 214 यामध्ये 15,114 पुरुष तर 10,100 महिलांचा समावेश होतो.

जिल्हयातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – अब्दूल सत्तार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या