24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeसोलापूरसोलापूर शहरात १९ तर ग्रामीणमध्ये १२५ जण कोरोना पॉझिटीव्ह

सोलापूर शहरात १९ तर ग्रामीणमध्ये १२५ जण कोरोना पॉझिटीव्ह

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहरात 19 रुग्ण आढळले असून यामध्ये 12 पुरुष तर 7 स्त्रियांचा समावेश आहे. उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 12 इतकी आहे.आज रविवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 983 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 964 निगेटीव्ह आहेत.आज एकही जणांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9795 असून एकूण मृतांची संख्या 543 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 444 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8808 इतकी आहे. रविवारी ग्रामीण भागातील 125 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 79 पुरुष तर 46 महिलांचा समावेश होतो. बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 201 आहे. यामध्ये पुरुष 145 तर 56 महिलांचा समावेश होतो . 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.एकूण 2737 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2612 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 32 हजार 209 इतकी झाली आहे. यामध्ये 19,871 पुरुष तर 12,338 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे. आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 958 जणांचा मृत्यू झाला आहे यात 685 पुरुष तर 273 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 721 आहे .यामध्ये 1249 पुरुष तर 472 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 29 हजार 530 यामध्ये 17,937 पुरुष तर 11,593 महिलांचा समावेश होतो.

केंद्रसरकार नक्षलवाद संपवण्याच्या तयारीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या