23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeसोलापूरसांगोला-पंढरपूर रोडवर ट्रक-कारच्या अपघातात २ ठार

सांगोला-पंढरपूर रोडवर ट्रक-कारच्या अपघातात २ ठार

एकमत ऑनलाईन

सांगोला : भरधाव ट्रक आणि स्विफ्ट कारच्या झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. हा अपघात आज रविवारी दुपारी २ च्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील मठ वस्तीजवळ घडला. सुशांत सुभाष केदार (२२) व शनिदेव प्रकाश केदार (२० दोघेही रा. वासुद ता. सांगोला) अशी मृतांची नावे आहेत.

अपघात एवढा भीषण होता की, स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. एम एच ४५ एन -५७०४ या स्विफ्ट कारमधून सुशांत केदार व शनिदेव केदार दोघेजण पंढरपूरकडून सांगोल्याकडे येत होते. त्यादरम्यान खर्डीकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या स्विफ्ट कारला मठवस्तीजवळ समोरून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दाखल झाल्यानंतर जखमींना तात्काळ शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची माहिती मिळताच केदार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या