टेंभुर्णी : वरवडे टोल नाक्याजवळ टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्यांचे टीम व मोडंिनब येथील महामार्ग सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई करून अवैद्यरित्या विक्रीसाठी गांजा घेऊन जाणारी स्कोडा कार पकडली व तेथून कार चालकाने पळ काढला. या कारमधून सुमारे 21 लाख 41 हजार 220 रुपयेकिंमतीचा 214 किलो 122 ग्रॅम गांजा अंदाजे 15 लाख रुपयेकिंमतीची स्कोडा गाडी असा एकूण 36 लाख 41 हजार दोनशे वीस रुपयेकिंमतीचा माल जप्त केला ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान केले असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध एन डी. पी. एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना खब-या मार्फत पांढ-या रंगाच्या स्कोडा कार टऌ-06-अह-5922 मधील डिकी मध्ये गांजा ठेवून विक्रीसाठी वरवडे टोल नाका येथे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येणार असल्याची माहिती समजली पांढ-या रंगाची स्कोडा कार येताना दिसली त्यावेळी समोर पोलीस असल्याचे दिसता क्षणी कार चालकाने कारचा दरवाजा उघडून पाठीमागील बाजूने पळून गेला पोलिसांनी कारची तपासणी केली असता डिकी मध्ये गांजाचे अंदाजे दोन किलो वजनाचे 107 खाकी रंगाचे चिकट पट्टी लावलेले पुढे आढळून आले कार मधील गांजाचे वजन केले असता 214 किलो 122 ग्रॅम भरले त्याचीकिंमत 21 लाख 41 हजार दोनशे वीस रुपये एवढी आहे 15 लाख रुपयेकिंमतीची स्कोडा गाडी पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात हवालदार शिवाजी भोसले यांनी फिर्याद दिली.
करमाळाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी कारवाईचे आदेश दिले टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे सहाय्यक फौजदार आशोक बाबर, अभिमान गुटाळ, हवालदार शिवाजी भोसले, अजित उबाळे, धनाजी शेळके, बालाजी घोळवे, विशाल शिंदे, गोंिवद बचुटे, आसिफ आतार, चालक राजेंद्र खंडागळे हे कारवाई करण्यासाठी रवाना झाले. मोडंिनब येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पडवळ व महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस नाईक केशव सुर्वे, हावलदर अमोल भोरे, गणेश शिंदे, रामेश्वर पवार या टीमने ही कारवाई केली.
लस प्रभाव तपासण्यासाठी अधिक डेटाची गरज