25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरअवकाळी पावसामुळे २३६१ हेक्टर क्षेत्र बाधीत

अवकाळी पावसामुळे २३६१ हेक्टर क्षेत्र बाधीत

एकमत ऑनलाईन

सोलापूर : कोरोनाच्या संकाटाचा सामना करणा-या सोलापूर जिल्ह्यापुढे अवकाळी पाऊस आणि वादळी वा-याने नवे संकट निर्माण केले आहे. कडक संचारबंदी, लॉकडाउन यामुळे शेतमालाचे भाव गडगडल्याने शेतकरी अगोदरच चिंतीत होते. त्यातच अवकाळी पाऊस आणि वादळी वा-यामुळे आलेल्या संकटाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापूर शहर व जिल्हयात १३ व १४ एप्रिलला झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वा-याचा फटका जिल्ह्यातील ६२ गावांना बसला आहे. तीन हजार ४७५ शेतकरी बाधित झाल्याचे नजर अंदाज अहवालातून समोर आले आहे.

६२ गावामधील २ हजार ३६१ हेक्टरवरील पिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्याच्या एका गावातील चार शेतक-यांचे ३.९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील २३ गावांमधील २९१ शेतक-यांचे १७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील ११ गावांमधील ३६८ शेतक-यांचे २५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पंढरपूर तालुक्यातील २६ गावांमधील दोन हजार ८११ शेतक-यांचे १ हजार ९३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सांगोला तालुक्यातील एका गावातील एका शेतक-याचे ०.२० हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील एका शेतक-याचा पावसामुळे एक टन बेदाणा ओला झाला असल्याचेही या पाहणीतून समोर आले आहे.

अवकाळी पाऊस व वादळी वा-याचा सर्वाधिक फटका दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर या तालुक्यांना बसला आहे. मंगळवेढा, अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा आणि माळशिरस या तालुक्यांमध्ये १२ ते १४ एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे नुकसान झाले नसल्याची माहितीही या नजर अंदाज अहवालातून स्मोर आली आहे.

नांदेडकरांसाठी एकच पर्याय कडक लॉकडाऊन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या