26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeसोलापूरहॉटेल पॅराडाईज मधील ८ नृत्यांगनासह २९ इसमाना अटक

हॉटेल पॅराडाईज मधील ८ नृत्यांगनासह २९ इसमाना अटक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शिवाजी नगर बाळे परिसरातील हॉटेल पॅराडाईजमध्ये महिलांकडून अश्लील वृत्त सुरू असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेला कळली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हॉटेल पॅराडाईजवर छापा टाकला. यावेळी अश्लिल व विभत्स नृत्य करणा-या ८ नृत्यांगना व त्यांच्यावर पैसे उधळणा-या २९ इसम यांना घेतले ताब्यात झाले आहे. तसेच ४९ लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हॉटेल पॅराडाईजमध्ये महिला तोकडे कपडे घालून अर्धनग्न नृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना कळाली. माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा मारला. आठ महिला स्टेजवर अश्लील हावभाव करत मृत्य करत होत्या तसेच काहीजण त्यांच्या अंगावर चलनी नोटा उडवून त्यांच्या अंगाला स्पर्श करत होते. यामुळे पोलिसांनी सर्व पुरुष व महिलांना ताब्यात घेतले. या छाप्यात ४८ लाख, ९८ हजार ३३० रुपयेकिंमतीचा मुददेमाल जप्त केला.

दरम्यान, पोलिसांनी हॉटेल पॅराडाईजचे मालक बाबा जाफर पठाण हा त्याचे हस्तक संजय पोळ व मॅनेजर मुकेशसिंग बायस यांचेकरवी हॉटेल पॅराडाईज ऑर्केस्ट्रा बार चालवित होता. त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस निरीक्षक निखिल पवार, संदीप शिंदे, फौजदार शैलेश खेडकर, सहायक फौजदार सुहास आखाडे, पोलीस हवालदार औदुंबर आटोळे, अजय पाडवे, दीपक किर्दक, पोलीस नाईक राजेश चव्हाण, संतोष फुटाणे, राकेश पाटील, विनायक बर्डे, सागर गुंड, सिद्धाराम देशमुख, कुमार शेळके, सोमनाथ सुरवसे, कृष्णात कोळी, सचिन बाबर, संतोष माने, स्वप्नील कसगावडे, राजू मुदगल, प्रविण मोरे, नीलेश शिरूर, दत्तात्रय कोळेकर, विद्यासागर मोहिते, नेताजी गुंड, रंजीतंिसग परिहार, विजय निंबाळकर, महिला पोलीस शिपाई आरती यादव,आर वी. सोनवणे, नारंगकर, इमडे, शेरखाने यांनी पार पाडली.

याप्रकरणी संजय पोळ (वय ४१), मुकेशसिंग बायस (वय ४७ ), अजिंक्य अशोक देशमुख (वय ३०), मयुर लक्ष्मण पवार (वय-३५), विजय शिवशंकर तिवारी (वय ४७), विशाल राजेंद्र कोळी (वय २६), नितिन आप्पासाहेब सासणे (वय ३४), गोपाळ बाबु जाधव (वय ४८), सुधाकर संदिपान माने (वय २७), श्रीकांत प्रल्हाद शिंदे (वय २२), आकाश गणेश कांबळे (वय २७), मारूती केत (वय ३७), रजनिश भोसले (वय ३४), सचिन सुरेश जाधव (वय ३५), अमर देविदास जमादार (वय २७), आकाश गुरव, दीपक सुंदरसिंग चव्हाण, प्रकाश वाघमारे, पुरुषोत्तम बने, अमिताब वाघमारे, अजय शिवाजी धजाल, प्रसाद लोंढे, प्रवीणकुमार शिंदे, प्रशांत गायकवाड, प्रभाकर फताटे, राजकुमार उडचान, निसार मुजावर, संतोष कदम, गौस शेख व ८ नर्तिका यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लातूर शहर व परिसरात पावसाची दमदार हजेरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या