31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeसोलापूरसोलापूरात कोरोनाचे ३० तर ग्रामीणमध्ये १९३ रूग्ण

सोलापूरात कोरोनाचे ३० तर ग्रामीणमध्ये १९३ रूग्ण

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर शहरात गुरुवारी कोरोनाचे नवे 30 रुग्ण आढळले असून यामध्ये 22 पुरुष तर 8 स्त्रियांचा समावेश आहे. उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 17 इतकी आहे.मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1120 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 1090 निगेटीव्ह आहेत. गुरूवारी 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10,267 असून एकूण मृतांची संख्या 561 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 448 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 9258 इतकी आहे. गुरुवारी ग्रामीण भागातील तब्बल 193 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 122 पुरुष तर 71 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 104 आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.एकूण 3162 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2969 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 34 हजार 959 इतकी झाली आहे. यामध्ये 21,644 पुरुष तर 13,315 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे. आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1026 जणांचा मृत्यू झाला आहे यात 737 पुरुष तर 289 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 763 आहे .यामध्ये 1312 पुरुष तर 451 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 32 हजार 170 यामध्ये 19,595 पुरुष तर 12,575 महिलांचा समावेश होतो.

नांदेडात वीज बिलाच्याविरोधात मनसेचा आक्रोश मोर्चा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या