33.6 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeसोलापूरमोबाईल चोरांकडून ३२ मोबाईल जप्त

मोबाईल चोरांकडून ३२ मोबाईल जप्त

एकमत ऑनलाईन

सोलापूर : मार्केट यार्ड परिसरात थांबलेला ट्रकचालक, शेतकरी ग्राहकांचे मोबाइल चोरून, हिसकावून नेत कमी किमतीत विकल्याप्रकरणी दोन हमालांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३२ मोबाइल पोलिसानी जप्त केले आहेत.

अक्षय सीताराम कांबळे (वय-२२,रा.भारतरत्न, इंदिरानगर), इम्रान शब्बीर इनामदार (वय-२४,रा. भारतरत्न, इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. गुरुवारी एका ट्रकचालकाच्या हातून दोन दुचाकीस्वारांनी दमदाटी करत मोबाइल हिस्कावून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्यांचा तपास करताना जोडभावी पोलिसांनी आरोपींची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. विचारपूस केल्यानंतर आरोपींनी चोरी केल्याचे कबूल केले. दरम्यान त्यांच्याकडून ३ लाख ७७ हजार रुपयांचे ३२ मोबाइल जप्त करण्यात आले आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून,त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याचे पोलिसानी सांगितले.

ही कामगिरी पोलिस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त संतोष गायकवाड, जोडभावी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि पवार, पोसई चक्रधर ताकभाते, हेडकॉस्टेबल श्रीकांत पवार,खाजप्पा आरेनवरू, भारत गायकवाड, शीतल शिवशरण,सचिन बाबर, सुरेश जमादार, अय्याज बागलकोटे,स्वप्नील कसगावडे, सोमनाथ थिटे, उमेश कात्रजकर यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या