22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeसोलापूरसोलापूर शहरात ३५ तर ग्रामीणमध्ये ११७ कोरोना पॉझिटीव्ह

सोलापूर शहरात ३५ तर ग्रामीणमध्ये ११७ कोरोना पॉझिटीव्ह

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी कोरोनाचे नवे 35 रुग्ण आढळले असून यामध्ये 22 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 22 इतकी आहे.

मंगळवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 501 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 466 निगेटीव्ह आहेत.आज 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

मंगळवारी ग्रामीण भागातील तब्बल 117 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 72 पुरुष तर 45 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 164 आहे. आज 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

मंगळवारी एकूण 1248 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1141 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 30 हजार 101 इतकी झाली आहे. यामध्ये 18,591 पुरुष तर 11,510 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 895 जणांचा मृत्यू झाला आहे यात 636 पुरुष तर 259 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 882 आहे .यामध्ये 2 हजार 137 पुरुष तर 745 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 26 हजार 324 यामध्ये 15,818 पुरुष तर 10,506 महिलांचा समावेश होतो.

मराठा आरक्षणासाठी घटनापीठासमोरच चालवावे, स्थगिती उठवण्याची मागणी पुन्हा करणार! -अशोक चव्हाण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या