19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeसोलापूरसोलापूर शहरात ४२ रुग्णांची भर, दोघांचा मृत्यू

सोलापूर शहरात ४२ रुग्णांची भर, दोघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहरात आज नव्या ४२ रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. एमआयडीसी परिसरातील अनिता नगरातील ५५ वर्षीय पुरुष तर विजयपूर रोडवरील सैफूल परिसरातील ७० वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला आहे. मागील काही दिवसांत शहरात सरासरी शंभरपेक्षा अधिक रुग्ण सापडले होते मात्र आता ५० ते ५५ च्या सरासरीने रुग्ण आढळत आहेत.

राघवेंद्र नगर (विडी घरकूल), रविंद्र नगर (आकाशवाणी केंद्राजवळ), प्रताप नगर (विजयपूर रोड), विजया हौसिंग सोसायटी (कुमठे), स्वामी विवेकानंद नगर, थोबडे वस्ती (देगाव नाका), मल्लिकार्जुन नगर (उत्तर कसबा), बुधवार पेठ, सिव्हील क्वार्टर, सिद्धेश्वर हौसिंग सोसायटी (भवानी पेठ), वसंत विहार फेज दोन, न्यू पाच्छा पेठ, लोणार गल्ली, दक्षिण कसबा, दुर्वांकूर बँक कॉलनी (इंदिरानगर), दाजी पेठ, हरिपदम रेसिडेन्सी, संजिता अपार्टमेंट, हरेकृष्ण विझर, गुलमोहर अपार्टमेंट, काडादी चाळ, तृप्ती कॉर्नरजवळ (मोदी), सुरवसे नगर (कुमठा नाका), आदित्य नगर (आरटीओजवळ), चेतक सोसायटी (मुरारजी पेठ), साठे-पाटील वस्ती, लक्ष्मी विष्णू चाळ, शास्त्रीनगर आणि मुरारजी पेठ या परिसरात आज नवे रुग्ण सापडले आहेत.

Read More  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या