25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeसोलापूरशहर-जिल्ह्यात एकाच दिवशी ४७० रुग्ण कोरोनामुक्त

शहर-जिल्ह्यात एकाच दिवशी ४७० रुग्ण कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 146 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 हजार 941 अहवाल निगेटिव्ह आले असून 205 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 394 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

सोलापूरच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 27 हजार 998 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 753 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 4 हजार 506 जणांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 22 हजार 339 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.

आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या तीन व्यक्तींमध्ये माढा तालुक्­यातील चव्हाणवाडी येथील 34 वर्षीय महिला, मंगळवेढा तालुक्­यातील होनमाने गल्ली येथील 70 वर्षीय पुरुष आणि बार्शी शहरातील शिवाजीनगर येथील 85 वर्षीय महिलेचा समावेश आहे. कोरोना चाचण्यांचे 71 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील 1 लाख 80 हजार 231 कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तसेच शहरातील रुग्णसंख्या आता आठ हजार 993 झाली असून त्यापैकी सात हजार 683 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे. मात्र, मृतांची संख्या आता 498 झाल्यानेचिंता कायम आहे. आज भाग्योदय सोसायटीतील 38 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला असून गुरुवारी (ता. 8) रोजी ही महिला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. या पाश्र्­वभूमीवर नागरिकांनी लक्षणे दिसताच दवाखान्यात दाखल व्हावे, नियमांचे तंतोतंत पालन करुन स्वत:च्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरात आज भारत माता नगर, भवानी पेठ, एसआरपी कॅम्प, विद्या नगरी, इंदिरा नगर, विजय देशमुख नगर, सुशिल नगर, जुना संतोष नगर, द्वारका नगरी (विजयपूर रोड), सिध्देश्­वर पेठ, डी-मार्टजवळ, करंजकर सोसायटी, सुरवसे मित्र नगर, सहारा नगर, पोलिस मुख्यालयाजवळ, गांधी नगरजवळ, रामदेव नगराशेजारी, वर्धमान नगर (शेळगी), आंबेडकर नगर, कल्याण नगर, टिळक नगर, म्हाढा कॉलनी, रचना सोसायटी(जुळे सोलापूर), आशा नगर, सुनिल नगर, लक्ष्मी चौक (विडी घरकूल), विश्राम हौंिसग सोसायटी, अंत्रोळीकर नगर भाग- दोन, स्वागत नगर, तोडकर वस्ती (बाळे), दक्षिण सदर बझार, रोहिणी नगर (सैफूल), इंद्रधनू अपार्टमेंट, निरा नगर (बुधवार पेठ), साखर पेठ, उत्तर कसबा, व्यंकटेश अपार्टमेंट (दक्षिण सदर बझार) या भागात नवे रुग्ण आढळले आहेत.

शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीला प्राधान्य द्यावे. आ. माधवराव पाटील जवळगावकर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या