37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeसोलापूरशहरात ४८ तर जिल्ह्यात ४३५ कोरोनाबाधीत

शहरात ४८ तर जिल्ह्यात ४३५ कोरोनाबाधीत

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर शहर हद्दीत रविवारी कोरोनाचे 48 रुग्ण आढळले असून यामध्ये 28 पुरुष तर 20 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 137 इतकी आहे. यामध्ये 42 पुरुष तर 95 महिलांचा समावेश होतो. रविवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 395 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 347 निगेटीव्ह तर 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8299 असून एकूण मृतांची संख्या 467 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 881 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 6951 इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे. रविवारी ग्रामीण भागातील तब्बल 435 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 258 पुरुष तर 177 महिलांचा समावेश होतो. बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 215 आहे. आज 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात 11 पुरुषांचा आणि 3 महिलांचा समावेश होतोय.

रविवारी एकूण 2319 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1884 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 996 इतकी झाली आहे. यामध्ये 14,784 पुरुष तर 9212 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे. आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 659 जणांचा मृत्यू झाला आहे यात 462 पुरुष तर 197 महिलांचा समावेश होतोय.जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 6276 आहे .यामध्ये 4 हजार 232 पुरुष तर 2044 महिलांचा समावेश होतो.आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 17 हजार 61 यामध्ये 10,088 पुरुष तर 6973 महिलांचा समावेश होतो.

सोयाबीन, कपाशीचे नुकसान; पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या