22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeसोलापूरसोलापुरात ५ पिस्तुल व १० जिवंत काडतुसे जप्त

सोलापुरात ५ पिस्तुल व १० जिवंत काडतुसे जप्त

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हददीत पिस्तुल विक्रीसाठी आलेल्यास पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली आहे.प्रविण राजा शिंदे (रा मुपो वडुज ता कराड जि सातारा) असे संशयीत आरोपीचे नाव आहे.सोलापूर पोलिसांनी सखोल तपास करत त्याच्या आणखीन तीन साथीदारांकडून देखील पिस्तुल जप्त केले आहे.एमआयडीसी पोलिसांनी एकूण चार संशयीत आरोपी आणि 5 पिस्तुल व 10 जिवंत काडतुसे जप्त केले आहे.सर्व संशयीत आरोपी हे सातारा जिल्ह्यातील असून सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ वैशाली कडुकर यांनी दिली.

पोलीस निरीक्षकांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. प्रवीण शिंदे हा संशयीत आरोपी साताराहुन सोलापुर शहरात पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांना प्राप्त झाली होती. पोलिसांना त्याच्या दुचाकीचा क्रमांक देखील प्राप्त झाला होता.एम एच ११ सीआर ५२०९ असे दुचाकीचे क्रमांक आहे.एमआयडीसी पोलीस ठाणे येथील एपीआय रोहित चौधरी यांच्या पथकाने १जून २०२२ रोजी अक्कलकोट रोड वरील एका खाजगी शाळेसमोर सापळा लावला होता. प्रविण राजा शिंदे (वय ३० वर्षे रा मुपो वडुज ता कराड जि सातारा) यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता आरोपीचे ताब्यामध्ये ०१ देशी बनावटीची पिस्तुल व ०२ जिवंत काडुतसे मिळुन आले.

तपास करत पोलिसांनी आणखीन तीन संशयीत आरोपींना अटक केले. प्रवीण शिंदे यास पोलीस कोठडीत सखोल तपास केला. त्याच्या साथीदारांची नावे त्यांनी सांगितली. त्यामध्ये स्वरुप विजय पाटील( रा मुपो तांबवे ता कराड जि सातारा) याकडून ०१ देशी बनावटीची पिस्टल व ०२ जिवंत काडतुस अमोल उर्फ पप्पु विलास खरात (रा मुपो दहिवडी ता माण जि सातारा) याचेकडुन ०१ देशी पिस्टल व ०६ जिवंत काडतुस , ओकांर उर्फ रावडी जालींदर देशमुख (रा सातारा) यांचेकडुन ०२ देशी पिस्टल असे एकुन ०५ देशी बनावटीची पिस्टले व १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
5 जिवंत पिस्तुल आणि 10 जिवंत काडतुसे सोलापूर पोलिसांनी जप्त केली आहेत.पण या पिस्तुलांचा वापर झाला की नाही याचा बॅलेस्टिक डिपार्टमेंट कडून तपास करणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ कडुकर यांनी दिली.तसेच सोलापुरात प्रवीण शिंदे हा कोणाला पिस्तुल विक्री करणार होता याचा तपास सुरू आहे.लवकरच ती माहिती देण्यात येईल असेही पोलिसांनी सांगितले.

ही कामगिरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केली. सदर कामगिरीकिंवा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने ,गुन्हे प्रकटीकरण थकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक रोहित चौधरी, पोलीस हवालदार राकेश पाटील, पोलीस नाईक चेतन रुपनर, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, अय्याज बागलकोटे, पोलीस शिपाई अश्रुभान दुधाळ, अमोल यादव किशोर व्हनगुंटी, सचिनकुमार जाधव, काशीनाथ वाघे, शैलेश स्वामी, शंकर याळगी, करार जमादार यांनी पार पाडली आहे..

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या