अकलूज : अकलूज येथील युवा शेतकरी सौरभ संपतराव इंगळे यांनी बेळगाव पोपटी ढब्बू मिरची चे सत्तर गुंठ्यांत 50 टन भरघोस उत्पादन घेऊन आधुनिक प्रकारच्या शेती केल्याने उत्पन्न मिळते हे दाखवून दिले आहे. पाटीलवस्ती तालुका माळशिरस येथील सत्तर गुंठे क्षेत्रात त्यांनी बेळगाव पोपटी शिमला मिरची ची लागवड केली आहे.त्यासाठी लागवडीपुर्व मशागती बेड,बेसल डोस ,मल्चींग,ड्रिप सह लागवड केली.याचे रोपे साई नर्सरी अकलूज यांचे कडून उपलब्ध झाले.
पंचेचाळीस दिवसात येणारे हे पीक असून यासाठी इंगळे यांना चार ते पाच लाख रूपये खर्च आला आहे तसेच संपूर्ण तोडणी नंतर 50 ते 60 टन माल निघून 20 -25 रूपये दराने 10 ते 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे सांगितले. यासाठी सेंद्रिय खते,पाणीमिश्रीत खतांचा वापर केला आहे.गोगलगाय ही झाडांवर अॅटॅक करते त्यामुळे रात्रीच्या वेळी गोगलगाय पासून संरक्षण करण्यासाठी त्यांना वेचून सोडण्यात आले.
शिमला मिरची या पिकास हाॅटेल व्यावसाय, फास्ट फूड कंपनी तसेच परदेशात मागणी जास्त आहे. सदर माल सांगली, पुणे,बेंगलोर,हैदराबाद येथून व्यापार्यांमार्फत परदेशात जातो. हे कमी वेळात येणारे पीक आहे योग्य नियोजन केल्यास जास्त उत्पन्न घेणे शक्य आहे. मागील वर्षी पहिल्यांदा हे पीक घेतले सुरूवातीला 60 ते 70 रूपये पर्यंतचा दर पहिल्या तोडणीला आला परंतु मार्च मध्ये झालेल्या लाॅकडाऊन मध्ये व्यापार्यांनी पाठ फिरवली आणि शेवटी पाच रूपये दराने माल द्यावा लागला.यावर्षी देखील कोरोना मुळे दर कमी न झाल्यास चांगले उत्पन्न घेता येईल असेही सौरभ इंगळे म्हणाले.
सौरभ संपतराव इंगळे यांनी कोल्हापूर येथून बीएस्सी अॅग्री तर एम आयटी पुणे येथून एम बी ए पुर्ण केले आहे सध्या किसान फोरम पुणे येथे कार्यरत आहे.सध्या कोरोना पाश्वभूमीवर ऑनलाईन कामकाज पाहत शेती करत आहेत. त्यांना यासाठी जयराज माने पाटील आणि वडील संपतराव इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले तर विशाल घाडगे,लक्ष्मण घाडगे,नितीन माने,राजू घाडगे यांचे सहकार्य लाभले.
शेतकर्यांनी आता आधुनिक आणि गटशेतीकडे वळले पाहिजे यामुळे नवीन पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, भांडवल उभारणी, अभ्यास दौरा, खते, महागडी औषधैआदी अवलंब करून दर्जेदार सामुहीक शेतीतून चांगले उत्पादन घेता येईल.पारंपरिक शेतातून आधुनिक शेतीकडे येणे शेतकर्याच्या समृद्धीसाठी गरजेचे आहे.
सौरभ संपतराव इंगळे
युवा शेतकरी, पाटीलवस्ती अकलूज.
राष्ट्रवादी- भाजपाचे सरकार स्थापन होणार होते. पण शरद पवारांनी ऐनवेळी निर्णय बदलला !