30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeसोलापूर८ वर्षांच्या चिमुरडीसह बार्शीत ६ जणांना कोरोनाची लागण

८ वर्षांच्या चिमुरडीसह बार्शीत ६ जणांना कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/बार्शी/सोलापूर
बार्शी तालुक्यातील रातंजन येथील ८ वर्षीय चिमुरडीला कोरोणाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बार्शी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत चालल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पाठविलेल्या १० पैकी ६ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर अद्याप बरेच अहवाल येणे बाकी असल्याचे डॉ. जोगदंड यांनी सांगितले. आलेल्या ६ कोरोनाबाधीतांपैकी रातंजन गावची ८ वर्षाची चिमुरडी आहे.तर शेंद्रीतही नव्याने ४ कोरोनाबाधित व जामगावमध्ये १ असे एकूण ६ कोरोनाबाधित रविवारी तहसीलदार प्रदीप शेलार यांनी दिलेल्या माहीतीतून पुढे आले.

रातंजनच्या जिल्हा प्राथमिक शाळेत एकूण १५ जण क्वारंटाइन आहेत त्यापैकी लहान कोरोनाबाधित चिमुरडीच्या घरातील चौघे आहेत.तर जामगावमध्येही आज नव्याने १ रुग्ण आढळल्याने जामगावच्या कोरोनाबाधीतांची संख्या ५ झाली आहे.तर दुसरीकडे शेंद्रीतही आज नव्याने ४ रुग्ण आढळल्याने शेंद्रीच्या एकूण कोरोनाबाधीतांची संख्या आता ५ वर पोहोचली आहे.

Read More  आनंद मायदेशी परतला!

तर तिकडे वैराग मात्र एकाच कोरोनाबाधित व्यक्तिवर थांबले असून गावकर-यांमध्ये सध्यातरी समधानाचे वातावरण आहे.मात्र दुसरीकडे आता जिल्हा प्रशासनानेही कोरोनाबाधित गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यास सुरवात केली आहे.मात्र दुसरीकडे बार्शी शहर अद्याप सुरक्षित असलेतरी कोरोनाचे संकट शहारावर येऊ नये म्हणून ४ दिवसाच्या जनता कर्फ्यूची मागणी विविध पक्ष,संघटना, सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

दरम्यान सोलापूर शहर जिल्ह्यात रविवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आजचे तपासणी अहवाल – ७९, कोरोना पॉझिटिव्ह- २६ (पु. १३, स्त्री – १३), निगेटिव्ह- ५३, मृत संख्या- १ – (१ पु), एकुण पॉझिटिव्ह- ८९१, एकुण निगेटिव्ह – ६२२४, एकुण चाचणी- ७११५, एकुण मृत्यू- ८४, एकुण बरे रूग्ण- ३८० अशी माहिती देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत तपासणी अहवाल देण्याचे कामकाज सुरु होते.

बाहेरगावावरून मुख्यत्वे पुणे, मुंबई येथून आलेले नागरिक जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाईन केल्यामुळे प्रसार झाला नाही. पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती क्वारंटाईन कक्षातील असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जामगाव आणि शेंद्रीचीही परिस्थिती लवकर सुधारण्यासठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून सुचनांचे पालन करावे.
-प्रदिप शेलार (तहसीलदार, बार्शी)

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या