30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeसोलापूर६५ लाखांचा गांजा पकडला

६५ लाखांचा गांजा पकडला

एकमत ऑनलाईन

सोलापूर : आंध्र प्रदेशातून सोलापूरच्या दिशेने एका टेम्पोमध्ये गांजा घेऊन येताना तांदुळवाडीजवळ पुणे सीमाशुल्क अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. गांजाचीकिंमत ६५ लाख रुपये आहे. ४ ऑक्टोबर रोजी ही कारवाई झाली. तब्बल चारशे किलो गांजा जप्त केला आहे. आंध्र प्रदेशातील खम्मम जिल्ह्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणण्यात येत होता. तांदूळवाडी येथे मालवाहतूक करणारी वाहने थांबवून तपासणी करताना नळदुर्गच्या दिशेने आलेला एक आयशर कंपनीचा ट्रक येऊन थांबला. पण तपासणीसाठी तो पुढे न आल्याचे पाहून अधिका-यांनी जेव्हा ट्रकजवळ जाऊन पाहिले तेव्हा ट्रकचे इंजिन चालू असल्याच्या अवस्थेत दिसले. पण ट्रकमध्ये वाहनचालक आढळला नाही.

त्या ट्रकचा संशय आल्याने ज्या ढाब्यासमोर तो उभा होता तिथल्या लोकांकडे चौकशी करता त्याविषयी कोणालाही काही कल्पना नसल्याचे दिसले. हे वाहन काही वेळापूर्वी इथे नव्हते असेही लोकांनी अधिका-यांना सांगितले. बराच काळ या ट्रकशी संबंधित वाहनचालककिंवा इतर कोणीही न आल्याने, सदर ट्रकची संशयावरून जेव्हा तपासणी केली तेव्हा प्लॅस्टिक चिकटपट्टीने गुंडाळलेली पाकिटे लपवलेली आढळली. ट्रक कारवाईसाठी सोलापूरच्या सीमा शुल्क कार्यालयात आणला. ट्रकमध्ये गांजाची एकूण २०६ पाकिटे आढळली. याचे वजन ४१२ किलो आणि त्याची अंदाजेकिंमत ६५ लाख आहे.

ट्रक जप्त आहे. ट्रकमध्ये मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे गाडीच्या मालकाची माहिती मिळाली असून, त्याआधारे पुढील तपास व शोध घेतला जात आहे. सीमा शुल्क पुणे आयुक्त पी. के. बेहरा, संयुक्त आयुक्त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अलोक कुमार सिंह, अधीक्षक मदन देशमुख, अधीक्षक पवन करवंदे, अधीक्षक प्रमोद जाधव, वरिष्ठ निरीक्षक अमजद शेख, हवालदार भरत पवार यांनी कारवाई केली.

रिया न्यायालयीन कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या