सोलापूर : दिवसभरात कोणाच्या घराला कुलूप आहे याची पाळत ठेवून रात्री घरफोडी करणारा चोरट्याला खर्बयाच्या माहितीनुसार रूपाभवानी मंदिराजवळील नाल्याजवळ अटक. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ८३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केल्याचे सोमवारी सांगण्यात आले.
शहरामध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागिरक संतापले आहेत. गुन्ह्याचा तपास करण्याच्या दृष्टीने गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांच्या कार्यपध्दतीचा बारकाईने अभ्यास केला.त्याअनुषंगाने नियोजन करण्यात आले.
पोलिस निरीक्षक दोरगे, सहायक पोलिस निरीक्षक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोंिलगची आखणी केली. खब-याकडून २३ नोव्हेंबरच्या रात्री सराईत गुन्हेगार चोरलेले दागिने विकण्यासाठी रूपाभवानी मंदिर येथील नाल्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. लागलीच पथक सतर्क झाले. त्यांनी रूपाभवानी मंदिर परिसरात सापळा लावला. खब-याच्या माहितीनुसार पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय अंबादास सामलेटी तेथे आला. लागलीच त्यावर झडप घालून सपोनि महाडिक व त्यांच्या पथकाने सामलेटी याला ताब्यात घेतले, त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने नाव अक्षय सामलेटी असून, गोदूभाई नवीन विडी घरकुल परिसरात रहात असल्याचे सांगीतले. यानंतर त्याची झडती घेण्यात आली. यात त्याच्याकडे सोन्याचे दागीने आणी रोकड मीळाली. पोलिसी खाक्या दाखवून बोलते केले असता.त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगीतले.त्याच्याकडे ६६ हजार रुपयांचे दागिने आणी विस हजार ५०० रुपयांच्या चलनी नोटा आढळून आल्या. हा मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आली
सराईत गुन्हेगार अंबादास सामलेटी यांनी कबूल केलेले सर्व गुन्हे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. एका गुन्ह्यात १२ ग्रॅम वजनाने सोन्याचे लॉकेट याची किमत ३६ हजार, दुसया गुन्ह्यातील एक तोळ्याची सोन्याची अंगठी याची किमत पोलिसांकडून ३० हजार दाखवण्यात आली आहे. तसेच २७ हजार रुपयांच्या विविध दराच्या चलनी नोटाही जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलिस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त डॉ. दीपाली काळे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीनाथ महाडिक, हवलदार अंकुश भोसले, राजकुमार वाघमारे, अंबादास धायगुडे, सिद्धाराम देशमुख, नेताजी गुंड यांच्या पथकाने केली.