21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeसोलापूरसोलापूर शहरात ८७ नवे कोरोनाबाधित

सोलापूर शहरात ८७ नवे कोरोनाबाधित

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहरात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.सोलापूर शहर हद्दीत आज गुरूवारी दि.10 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 87 रुग्ण आढळले असून यामध्ये 58 पुरुष तर 29 स्त्रियांचा समावेश आहे.

आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 98 इतकी आहे. यामध्ये 58 पुरुष तर 40 महिलांचा समावेश होतो.
आज गुरूवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 606 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 519 जणांचे निगेटीव्ह तर 87जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज एक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7 हजार 304 असून एकूण मृतांची संख्या 436 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 808 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 6060 इतकी आहे.

धर्माबाद शहर खड्ड्यांच्या विळख्यात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या