27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरगूळमिश्रित रसायनाने भरलेले बॅरेल पोलिसांनी फोडले

गूळमिश्रित रसायनाने भरलेले बॅरेल पोलिसांनी फोडले

एकमत ऑनलाईन

सोलापूर : मुळेगाव तांडा ते बक्षीहिप्परगे (ता. द. सोलापूर) रोडच्या कडेला सुरू असलेल्या हातभट्टी दारू अड्डयावर पोलिसांनी अचानकपणे छापा मारला. या कारवाईत ४२ हजार रुपये किमतीचे गूळमिश्रित रसायन नष्ट करून बॅरेल पोलिसांनी फोडले. ही कारवाई शनिवार ११ जून २०२२ रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास सोलापूर तालुका पोलिसांनी केली.

पोलिस कॉन्स्टेबल संजय शंकर नेमाजी (वय ३२, रा. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विलास थावरू जाधव (वय ३५, रा. मुळेगांव तांडा, ता. द. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल हे करीत आहेत. करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुळेगांव तांडा ते बक्षीहिप्परगे रोडवर हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी शनिवारी रात्री

उशिरा धाड टाकून १० गूळमिश्रित रसायनाने भरलेले बॅरेल फोडले. त्यातील रसायन नष्ट करून टाकला. या कारवाईचा तपास पोलीस नाईक सय्यद करत आहेत. हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे गूळ, युरिया, बॅटरीच्या सेलच्या तुकडे, नवसागरचे बारीक तुकडे, कुजका गूळ, झाडाच्या सालीचे तुकडे असा एकूण ४२ हजार रुपये किमतीचा माल आढळून आला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या