34.4 C
Latur
Sunday, April 2, 2023
Homeसोलापूरकंटेनरच्या खाली दुचाकी घुसली; एक ठार तर एक गंभीर जखमी

कंटेनरच्या खाली दुचाकी घुसली; एक ठार तर एक गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : अक्कलकोट वरून सोलापूरकडे विरुद्ध दिशेने येणारा कंटेनरच्या खाली सोलापूर हुन कुंभारी कडे जाणाऱ्या दुचाकी थेट कंटेनर खाली घुसून एकाचा जाग्यावरच मृत्यू झाला. तर दुसरा इसम गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर जवळील टाटा शोरूम समोर घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,पवन आणि विनीत असे दोघाचे नावे असल्याचे सांगण्यात आले. दोघेजन एकाच दुचाकीवरुन सोलापूरहुन कुंभारी कडे निघाले होते. त्यावेळी अक्कलकोटहुन सोलापूरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट कंटेनर खाली जाऊन त्या कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.तर एक जण गंभीर रित्या जखमी झाला आहे.घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा करत अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमास उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवले तर मयत इसमाचा मृतदेह शवविछेदनासाठी पाठवला आहे.

या घटनेची प्राथमिक नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून,रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यात मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड.प्रशांत नवगिरे, अ‍ॅड. श्रीपाद देशक,सरकारतर्फे अ‍ॅड. आसावरी जोशी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. शांतवीर महिंद्रकर यांनी काम पाहिले.

 

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या