बार्शी : अलीपूर बायपासने दुचाकीवरून बार्शीकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून तिघांनी मारहाण करून रोख दहा हजार रुपये आणि दोन मोबाइल असा ३२ हजारांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. दरम्यान ज्याचा ऐवज लुटला त्यांनी वाटमारी करणान्यांच्या दुचाकीचा नंबर दिला.
या नंबरवरून तालुका पोलिसांनी दोघांना २४ तासात पकडून बार्शी न्यायालयात हजर केले असता न्या. एस. एम. सबनीस यांनी २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. नीलेश मंडले – अंधारे (वय १९) आणि जय सुधीर लोखंडे (वय २१, दोघे रा. अलीपुरा) अशी पोलिस कोठडीतील आरोपींची नावे आहेत. ही घटना १५ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. बार्शी कुर्डुवाडी बा वळणावर अलीपूर जवळ घडली. याबाबत सिराज युनूस शेख (रा. गुळपोळी, ता. बार्शी) यांनी १६ डिसेंबर रोजी तालुका पोलिसात फिर्याद दिली होती.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार
सिराज शेख है १५ डिसेंबर रोजी बा वळणावरुन निघाले होते. वार्शी- कुर्डुवाडी बा वळणावर तिघे चोरटे एका दुचाकी (एम.एच. १३/ डी. पी. ८३१३) वरुन आले. सिराज शेख यांची मोटारसायकल अडवून मारहाण करुन दोन मोबाइल आणि रोख दहा हजार रुपये काढून घेतले होते. यावेळी शेख यांनी त्यांच्या मोटारसायकलचा नंबर लक्षात ठेवला, बार्शी तालुका पोलिस ठाणे गाठून त्यांनी फिर्याद दिली.