21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeसोलापूरपंढरपूरच्या रणांगणावर रंगणार कडवी झुंज

पंढरपूरच्या रणांगणावर रंगणार कडवी झुंज

एकमत ऑनलाईन

सोलापूर (रणजित जोशी): सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे सर्वसामान्यांचे आराध्य दैवत. विठ्ठलामुळे देशभर आध्यात्मिकदृष्टया पंढरपूर तालुका राजकीय दृष्टया महत्वपूर्ण तालुका म्हणून ओळखला जातो. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकांचे रणशींग फुंकले गेले असून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवताडे रिंगणात उतरले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील आणि शिवसेना महिलाध्यक्षा शैला गोडसे हे ही रिंगणात आहेत. कै. भारत भालके यांनी तीन निवडणूका जिंकल्या मात्र वेगवेगळे पक्षातून ते निवडून यायचे. २०१९ ला ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे सुपूत्र भगीरथ भालके यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूकीत मैदानात उतरले आहे. राष्ट्रवादी भगीरथ भालके आणि भाजपकडून समाधान आवताडे यांच्यात कडवी झुंज रंगण्याची चिन्हे आहेत.

आवताडे गटाचे मंगळवेढा तालुक्यात निर्णायक वर्चस्व आहे. जिल्हा बँक, बाजार समितीसह सहकारी संस्थावर आवताडे गटाची पकड असून समाधान आवताडे यांनी उद्योगात यश मिळविताना राजकीय ताकदही वाढवल्याचे त्यांच्या निवडणूकीतील मतांच्या टक्केवारीवरून दिसून येते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस उमेदवार भारत भालके यांना ९७ हजार ८६३ मते म्हणजे ४०.०३ टक्के मते मिळाली. दुस-या क्रमांकावर असलेले महायुतीचे उमेदवार प्रशांत परिचारक यांना ८२ हजार ९५० म्हणजे ३६.७५ टक्के मते मिळाली होती.

शिवसेनेकडून रिंगणात असलेल्या समाधान आवताडे यांना ४० हजार ९१० मते म्हणजे १७.८३ टक्के मते मिळाली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत एकूण २ लाख २९ हजार ४९२ इतके म्हणजेच ७५.४६ टक्के मतदान झाले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत समाधान आवताडेंनी मंगळवेढा तालुक्यातून ५४ हजार १२४ मते घेत प्रथम क्रमांकाचे मतदान घेतले. मात्र पंढरपूर परिसरातून आवताडे यांना कमी मतदान झाले. राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांना ८९ हजार ७८७ मते म्हणजे ३७.४८ टक्के मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक ७६४२६ म्हणजे ३१.९० टक्के मते मिळाली. अपक्ष उमेदवार समाधान अवताडे यांना ५४ हजार १२४ म्हणजे २२.५९ टक्के मते मिळाली. २०१९ च्या निवडणूकीत एकूण २ लाख ३९ हजार ६९१ म्हणजे ७१.४१ टक्के मतदान झाले होते. २०१४ व २०१९ च्या लढतील भारत भालके यंना २०१४ ला ४० टक्क्यापेक्षा जास्त मते मिळाली होती तर २०१९ ला ३७.४८ टक्के मते होती. परिचारक यांना २०१४ लाख ३६.१५ तर २०१९ ला ३१.९० टक्के मते मिळाली. समाधान अवताडे यांना २०१४ लाख १७.८३ तर २०१९ ला २२.५९ टक्के मते मिळाली होती. समाधान अवताडे यांची मतांची टक्केवारी प्रत्येकवेळी वाढली त्यामुळे आवताडे यांची राजकीय ताकद वाढलेली दिसून येते. याच बाबींचा विचार करून भाजपने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवले आहे.

ठाकरे यांच्या स्मारकाचा मुंबईत भूमिपूजन सोहळा

परिचारकांच्या मुत्सद्देगिरीच्या अग्नीपरिक्षा
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून समाधान अवताडे तर राष्ट्रवादीकडन भगीरथ भालके मैदानात असून २००९ नंतर प्रथमच परिचारक गट पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या रणांगणावर उतरला नाही. प्रशांत परिचारक यांनी आपली ताकद अवताडे यांच्या पाठीशी लावण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ ला के. सुधाकरपंत परिचारक राष्ट्रवादीत असताना ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील त्यांनी पंढरपूर मतदार संघ सोडला होता. २०२१ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान अवताडे यांच्यासाठी मतदारसंघ सोडला आहे. वास्तविक पाहता परिचारक घराण्यातील कोणीही निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्याचा प्रचंड दबाव परिचारकावर होता मात्र प्रशांत परिचारकांनी दोन पावले मागे घेत अवताडे यांना पाठींबा दिला आहे.

२००९ च्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पराभवाचे खापर परिचारकांवर फुटल्यावर राष्ट्रवादीत त्यांची कोंडी झाली होती. यंदा समाधान आवताडे यांच्या विजयावरच परिचारकांची भावी राजकीय वाटचाल सुकर होईल. भाजप हा राष्ट्रवादीपेक्षाही अधिक हिशोबी पक्ष असून परिचारकांना अवताडे यांच्या विजयासाठी झटावे लागणार आहे. राजकारणात जवळच्या फायदयापेक्षा दूरच्या नुकसानीचा विचार आधी करावा लागतो. त्यामुळे तोच विचार करून प्रशांत परिचारकांनी दोन पावले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र परिचारकांच्या मुत्सद्देगिरीचा कस लागणार आहे.

पंढरपूर तालुक्यातील जातीय समीकरणे, पंढरपूर-मंगळवेढा परिसरातील विस्तार, सहकाराची समीकरणे आदी बाबीवर विधानसभेच्या विजयाचे गणीत ठरणार आहे. कै. भारत भालके यांनी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, प्रशांत परिचारक, सुधाकरपंत परिचारक अशा दिग्गज उमेदवारांना पराभवाची धूळ चारली होती. सहकाराची, जातीय अशी सर्व पाठींब्यावर तीन वेळा मैदान भारत दिग्गज नेत्यांना आसमान दाखवले होते. तगडा जनसंपर्क, सर्वसामान्य जनतेसाठी २४ तास उपलब्धता, विशेषत: तळागाळातल्या वंचित समाजघटकांशी जोडलेली नाळ, अचूक राजकीय बेरजेची समीकरणे जुळण्याचे कौशल्य यामुळे भारतनाना राजकीय मैदानातील अजेय योध्दा ठरले. भगीरथ भालके यांना भारत नानांचा संपन्न राजकीय वारसा लाभला आहे. भारत नानांचा लोकसंग्रह, लोकप्रियता हेच भगीरथ यांचे मोठे बलस्थान असून पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात भालके यांचे राजकीय वर्चस्व अबाधीत ठेवण्याची जबाबदारी भगीरथ भालके यांच्यावर आहे.

सर्वसामान्य जनतेचा कौल कोणाच्या बाजूने राहणार यावर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर केली असून निवडणूक प्रमुख म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तर उमेदवार प्रतिनिधी म्हणून उमेश परिचारक यांची निवड करण्यात आली आहे. समाधान अवताडे यांच्या विजयासाठी आता या दोघांना मेहनत घ्यावी लागणार आहे. पंढरपूर मतदार संघात पोटनिवडणुकीच्या रणांगणावर भगिरथ भालके व समाधान आवताडे यांच्यात सामना रंगणार असला तरी शैला गोडसे व सचिन पाटील यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे किती बदलणार यावरही निकालाचे चित्र अवलंबुन राहणार आहे.

पंढरपूर पोटनिवडणूक छाननीत आठ उमेदवारांचेअर्ज अवैध
पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भगिरथ भारत भालके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), समाधान महादेव आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), महेंद्र काशिनाथ जाधव (पिपल्स रिपब्लिकन पार्टी), राजाराम कोडींबा भोसले (बळीराजा पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, नागेश आण्णासो भोसले, इलियास हाजीयुसूफ शेख, रज्जाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी, संजय चरणू पाटील, अशोक ज्ञानदेव वाघमोडे,अभिजीत वामनराव आवाडे-बिचकुले, अमोल अभिमन्यू माने, सुनिल सुरेश गोरे, सिताराम मारुती सोनवले, सिध्देश्वर बबन आवताडे, मोहन नागनाथ हळणवर, रामचंद्र नागनाथ सलगर, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडूरंग मसुरे,मनोज गोंिवदराव पुजारी, बापू दादा मेटकरी, बिरुदेव सुखदेव पापरे या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी दिली.

ठाकरे यांच्या स्मारकाचा मुंबईत भूमिपूजन सोहळा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या