21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeसोलापूरशांती नगर येथे वीट भट्टी कामगाराची गळफास लावून आत्महत्या

शांती नगर येथे वीट भट्टी कामगाराची गळफास लावून आत्महत्या

एकमत ऑनलाईन

सोलापूर : नई जिंदगी परिसरातील शांतीनगर येथे राहणाऱ्या मलकारी दत्ता कोळी ( ३०) या विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्याने राहत्या घरातील खिडकीला सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्याला फासातून सोडवून महादेव कोळी (भाऊ) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तो उचारापूर्वीच मयत झाला. मयत मलकारी कोळी हा कामती वाघोली येथील वीट भट्टीवर कामाला होता. त्याची पत्नी दोन दिवसांपूर्वी कर्नाटक येथे माहेरी गेली होती. घरात एकटाच असताना त्याने हा प्रकार केला. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या