19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeसोलापूरभांडण रोखणा-या भावाच्या डोक्यात घातली वीट

भांडण रोखणा-या भावाच्या डोक्यात घातली वीट

एकमत ऑनलाईन

सोलापूर : आई आणि वहिनीशी भांडण करणा-या भावाला समजूत घालताना, भावानेच शिवीगाळ करत, एक तर तू जिवंत राहायचे, नाहीतर मी असे म्हणत डोक्यात वीट घालून जखमी केले. या प्रकरणी जखमी विनायक शिवाजी पवार(३१, रा. सुशीलनगर, भारती विद्यापीठ) यांच्या फिर्यादीवरून श्रीराम शिवाजी पवार (३६, रा. सुशीलनगर) याच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विनायक हे शुक्रवारी घरात झोपलेले असताना, श्रीराम हा घरात आईशी भांडण करत होता. यामुळे विनायक यांनी भांडण सोडविण्यासाठी गेल्यानंतर श्रीराम याने विनायकला तुला काय करायचे आहे? तू इथे का राहतो? ही सर्व जागा माझी आहे, असे म्हणत शिवीगाळ करत, लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, अंगणात पडलेली वीट डोक्यात घालून विनायकला जखमी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या