24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeसोलापूरमोहोळ सोलापूर महामार्गावर धावती कार पेटली

मोहोळ सोलापूर महामार्गावर धावती कार पेटली

एकमत ऑनलाईन

मोहोळ : मोहोळ – सोलापूर राष्ट्रीय महामार्गा वरील संत धन्य निरंकरी बाबा आश्रमा समोर धावत्या कारने अचानक पेट घेतला . चालकाच्या प्रसंगावधानामुळे व हॉटेल धुलवडचे मालक संजय क्षीरसागर यांच्या तत्परतेमुळे कारमधील तिघे बाहेर पडल्याने जीवित हानी झाली नाही व पुढील अनर्थ टळला . मात्र कारचे मोठे नुकसान झाले.

मोहोळ – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी ( ता . 5 ) रात्री साडेसातच्या सुमारास संत धन्य निरंकारी बाबा आश्रमा समोर एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे व हॉटेल धुलवडचे मालक संजय क्षीरसागर यांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक माहीती अशी की , पंढरपूरहून सोलापूरकडे राहुल कराळे हे स्वत: च्या कारने ( क्र . एमएच 42 के 8680 ) जात असताना संत धन्य निरंकारी बाबा आश्रमा समोर आल्यानंतर कार चालविणा-या कराळे यांना गाडीच्या बॉनेटमध्ये वायरिंग जळाल्याचा वास येत होता अन् धूरही येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी कार थांबविली. त्वरित गाडीच्या खाली उतरत दोन व्यक्तींना बाहेर उतरविले.

इतक्यात गाडीच्या इंजिनाने पेट घेतला . त्याक्षणी पेटलेल्या गाडीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या हॉटेल धुलवडचे मालक संजय क्षीरसागर यांच्या निदर्शनास गाडी पेटल्याचे आल्याने त्यांनी तत्काळ फोनवरून पोलिसांना याबाबतची माहिती दिली .यादरम्यान हॉटेल धुलवडचे मालक संजय क्षीरसागर व त्यांचा कामगार अरविंद माने , पोलिस सतीश पाटील , आजिनाथ काळे , होंडा शोरूमचा कर्मचारी फाटे यांच्या होंडा शोरूमचे कर्मचारी आदी उपस्थितांच्या मदतीने स्वत: बादलीने पाणी टाकत पेटलेली कार विझवण्यास मदत केली. गाडीचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती गाडी मालकाने दिली असून , अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अविनाश शिंदे करीत आहेत. कारचालकाचे प्रसंगावधान व संजय क्षीरसागर यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला .

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या