18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeसोलापूरमोहोळ जवळ कोळेगाव पाटी येथे गाडी पलटी, तीन जण ठार

मोहोळ जवळ कोळेगाव पाटी येथे गाडी पलटी, तीन जण ठार

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/मोहोळ
पुणे सोलापूर महामार्गावर पिकअप जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जागीच ठार झाले तर गंभीर जखमी ड्रायव्हरचे सिव्हील हॉस्पिटल सोलापूरमध्ये निधन झाल्याची घटना बुधवार दि. १६ रोजी पहाटे १:३० वाजता घडली आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कर्जत तालुक्यातील शेतकरी आपला कांदा विकण्यासाठी सोलापूर येथे निघाले होते. सदरचा पिकअप क्रमांक एम एच १६ ए वाय २६७४ हा कोळेगाव ता. मोहोळ येथे पलटी झाला. यामध्ये बसलेले शेतकरी पिरमलंिसग धोंडींिसग परदेशी वय ५५ वर्षे व दत्तात्रय भानुदास शेळके वय ५५ वर्षे दोघेही रा. कोरेगाव , ता. कर्जत, जि. अहमदनगर हे दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले.

या वाहनाचा चालक नितीन धुळाजी बंदगे, वय ३६ वर्षे रा. बंदगवाडी, ता. कर्जत हा या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचारासाठी सावळेश्वर टोल नाका येथील अँब्युलन्सने त्याला सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाला. मोहोळ येथे रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करण्याची सोय नसल्याने जखमीबरोबरच दोन्ही मयत शेतक-यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यामुळे सदरहू गुन्हाची फिर्याद सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या