30.1 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeसोलापूरटेलरिंग दुकानातून चोरी प्रकरणी जागामालकासह दोघांविरुध्द गुन्हा

टेलरिंग दुकानातून चोरी प्रकरणी जागामालकासह दोघांविरुध्द गुन्हा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : न्यायप्रविष्ट असलेले दुकान खाली करण्याचा तगादा लावून जागामालकाने भाडेकरुचा शिलाई मशीन तयार कपडे असा एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात जागामालकासह दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

अंबादास सिद्राम बनसोडे ( वय ५८), सागर अंबादास बनसोडे ( वय ३३, दोघे रा. आदित्यनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संदीप प्रकाश आकुडे (वय ३९, रा. अशोकनगर, विजापूर रस्ता ) यांनी टेलरिंग व्यवसाय करण्यासाठी बनसोडे यांच्याकडून २००४ मध्ये अशोकनगर येथील दुकान भाड्याने घेतले होते. २००६ साली करार संपल्याने आकुडे यांनी २॰१३ पर्यंत करार करून मुदत वाढवून सदर दुकान भाड्याने घेतले.

त्यानंतर पुन्हा २०१४ ते २०२५ पर्यंत भाडेकरार केला. परंतु २०१९ पासून जागामालक बनसोडे यांनी फिर्यादी आकुडे यांना दुकान खाली करण्यासाठी तगादा लावला होता. या तागद्याला कंटाळून आकुडे यांनी न्यायालयामध्ये याप्रकरणी दावा दाखल केला असे असताना आरोपी बनसोडे पिता-पुत्रांनी १० जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजता दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ३५ हजार रुपये किमतीची शिलाई मशीन व ५० हजार रुपयांचे विक्रीस तयार करून ठेवलेले कपडे चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या