सोलापूर: दहावीत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला मी तुझ्यावर प्रेम करतो, असे सांगत तिचा पिच्छा करणाऱ्या नीलेश सुरेश काळे (रा. मोहोळ) या तरुणावर विनयभंगाचा आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे.
पीडिता ही पंधरा वर्षांची असून ती सोलापुरातील एका शाळेत दहावीला शिकते. आरोपी नीलेश याची ओळख काही दिवसांपूर्वी पीडितेशी झाली. तेव्हा त्याने पीडितेचा फोन नंबर घेतला. त्यानंतर तो तिच्याशी वारंवार फोनमध्ये बोलत होता. काही दिवसांपूर्वी त्याने तिला शाळेजवळून आपल्या दुचाकीवर घेऊन गेला. सात रस्ता परिसरात नेऊन तेथे मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण दोघे लग्न करू असे म्हणाला. ही घटना तिने आईला सांगितली. त्यामुळे पीडितेच्या आईने आरोपीला व त्यांच्या आई वडिलांना घडलेल्या घटनेबाबत सांगितले. त्यानंतरही आरोपीने पीडितेचा पिच्छा करणे सुरूच ठेवले. यामुळे यावरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.