23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeसोलापूरविठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्यावर गुन्हा दाखल

विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्यावर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांच्या विरोधात डिझेल खरेदी प्रकरणात अपहार केल्याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार भालकेंसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात पेट्रोलपंप मालकाचाही समावेश आहे. याबाबतची माहिती तक्रारदार विलास पाटील यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिली. मागील वर्ष-दीड वर्षांपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी जोरदार शाब्दिक धुश्मचक्री होताना दिसत आहे. त्यातच आता पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे अडचणीत आले आहेत.

भगीरथ भालके यांच्याविरुद्ध अपहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर भालके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने या विषयाची स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
डिझेल खरेदी अपहार प्रकरणात कारखान्याचे सभासद विलास शिवाजी पाटील यांनी न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार भगीरथ भालके, तत्कालीन कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळासाहेब कर्पे, सरकोली येथील पेट्रोल पंप मालकासह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मालकीचा पेट्रोल पंप असतानाही कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके व तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक बाळासाहेब कर्पे यांनी सरकोली येथील भैरवनाथ पेट्रोल पंपावरुन कारखान्याच्या नावे पावत्या तयार करुन १६ हजार लिटर डिझेलची खरेदी केल्याचे दाखवले. त्यातून ८ लाख ३६ हजार ५३ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार विलास पाटील (रा.रोपळे ता.पंढरपूर) यांनी न्यायालयात केली होती.

पाटील यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाने सर्व पुराव्याची पडताळणी करुन भालके व कर्पे यांच्यासह पंपाचे मालक व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पंढरपुर तालुका पोलिस करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या