21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसोलापूरघोड्याच्या मालकीवरून मारहाण, अनोळखी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

घोड्याच्या मालकीवरून मारहाण, अनोळखी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

सोलापूर : घोड्याच्या मालकीवरून देसाई नगर येथे मारहाणीचा प्रकार घडला. त्यावरून सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नीलाबाई एकनाथ लोखंडे (वय ३०, रा. आरकेरी, इंडी, विजापूर) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणिमंगळसूत्र गहाळ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना १५ जुलै रोजी देसाई नगर (शांती नगर परिसर नई जिंदगी) परिसरात घडली. लोखंडे यांनी १६ जुलैला पहाटे फिर्याद दिली.

नीलाबाई लोखंडे यांचा परिवारिक मेंढपाळ व्यवसाय आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांचा एक घोडा सोलापुरात हरवला होता. तो १५ जुलै रोजी देसाई नगर परिसरातून जाताना दिसला. तो नेताना एका तरुणाने हरकत घेतली. त्यावर हा घोडा आमचा आहे. तो हरवला होता. त्यामुळे मी घेऊन जात आहे, असे लोखंडे यांनी सांगितले. काही वेळाने पाच-सहा महिला तेथे आल्या, ‘आमचा घोडा कुठे घेऊन चालला असे म्हणत त्यांनी श्रीमती लोखंडे यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली.

घोड्यावरील सामानही खाली टाकले. दरम्यान, सोन्याचे दागिने खाली पडले, श्रीमती लोखंडे यांनी त्यांच्या नातेवाइकांना बोलवून घेतले. पतीसह काहीजण आल्यावर त्यांनाही जमावाने मारहाण केली. आणखी एका महिलेच्या कानातील फुलेही गहाळ झाली आहेत. मंगळसूत्र काढून घेतले, मारहाण केली यावरून तक्रार देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या