25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeसोलापूरमहिलेकडून देहविक्री व्यवसाय करून घेतल्याप्रकरणी तीघांवर गुन्हा

महिलेकडून देहविक्री व्यवसाय करून घेतल्याप्रकरणी तीघांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

करमाळा : करमाळा व मोहोळ ते टेंभुर्णी रोडवरील सहारा लॉज येथे देहविक्रीचा व्यवसाय करून घेतल्याप्रकणी करमाळा पोलिसात तीन संशयित आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापुर) येथील पीडितेच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे याचा तपास करत आहेत. याप्रकरणात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ४,५,६ सह ३४४, ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

पीडितेकडून नोव्हेंबर २०२१ पासून मुलीला विकुन दावण्याची धमकी देवून फिर्यादी पीडितेकडुन जबरदस्तीने टेंभुर्णी ते मोहोळ रोडवरील सहारा लॉज व करमाळा येथील एकाच्या राहते घरी व वेगवेगळ्या पुरुष ग्राहकांकडुन एक हजार, दीड हजार व दोन हजार असे घेवून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला आहे. त्यातून त्यांनी सुमारे चार लाख रुपये कमावलेले आहेत.

यामध्ये त्यांनी फिर्यादीला कंडोमचे पाकीट पुरविले, जेवण खाऊ घालुन राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यांना पीडितेने मोबदला मागीतला म्हणून नेहमी धमक्या दिल्या. तिला मारहाण करून जखमी केले. यामध्ये गुन्हा दाखल झालेले दोन संशयित आरोपी टेंभुर्णी येथील तर एकजण करमाळा येथील आहे. यामध्ये पीडितेला संशयित आरोपींनी हाताने, लाथाबुक्याने व लाकडाने मारहाण करुन डांबुन ठेवुन जबरदस्तीने देहविक्री करायला लावले, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या