26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरदोघांविरुद्ध विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

दोघांविरुद्ध विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : आयटी कंपनीत नोकरीस असलेल्या तरुणीला प्रेमाचे नाटक करून जवळीक, लग्न करतो म्हणून ओळख वाढवली. लग्न करण्याचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून विनयभंग केला. चार वर्षे हा प्रकार चालला. लग्नाची विचारणा करताना तू दुसऱ्या जातीची आहे म्हणून लग्नाला नकार दिला. मित्राने तिचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार तरुणीने जेलरोड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार शंतनू कोल्हापुरे व रूपेश महिंद्रकर या दोघांविरुद्ध २७ जुलै रोजी विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार यातील सोलापुरात राहणारी तरुणी एका आयटी कंपनीत कामास आहे. सध्या तिचे सोलापुरात वर्क फ्रॉम होम सुरू आहे. चार वर्षापासून तिची शंतनू गजानन कोल्हापुरे या तरुणानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवली. फेब्रुवारी २२ मध्ये घरी बोलावून घेतले. पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून लज्जास्पद वर्तन केले. लग्नाबद्दल विचारणा केली असता ‘तू दुसऱ्या जातीची आहेस, असे म्हणून लग्नास नकार दिला. पुढे बोलणेही टाळले. एके दिवशी फोन केला असता त्याचा मित्र रुपेश महिंद्रकर याला फोन दिला.

त्या मित्राने तू माझ्या मित्राचा नाद सोडून दे नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायला लावेन, अशी धमकी दीली.दोघांविरुद्ध तक्रार देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात शंतनू गजानन कोल्हापुरे व रूपेश महिंद्रकर या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या