16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeसोलापूरदसमेगाव येथे शेतकरी दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या

दसमेगाव येथे शेतकरी दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या

एकमत ऑनलाईन

वाशी : दसमेगाव (ता.वाशी) येथे पती-पत्नीने राहत्या घरात एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्घटना रविवारी (दि.9) सकाळी उघडकीस आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मयतांच्या मुलाने शेतरस्त्याच्या कारणावरुन दोघे त्रस्त होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिसांनी सांगितली असून वाशी पोलीस ठाण्यात मात्र दोन आकस्मात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाशी तालुक्यातील दसमेगाव येथील रहिवाशी बाबुराव रंगनाथ उघडे व सारीका बाबुराव उघडे हे शेतकरी दाम्पत्य राहते. रविवारी (दि.9) सकाळी ते घराबाहेर दिसत नसल्याने शेजारी लोकांनी घराजवळ जाऊन चौकशी केली. घराचे दारबंद होते. यामुळे खिडकी उघडून आतमध्ये पाहीले असता या जोडप्याने देवीच्या मूर्तीसमोर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचे निदर्शनास आले.

बाबुराव उघडे यांनी स्लॅपच्या कडीला व पत्नी सारीका उघडे घरातील खिडकीला एकाच नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पहायला मिळाले. ही घटना शनिवारी म्हणजेच 8 ऑक्टोबरच्या रात्रीच घडली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्याच कारण मात्र समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती समजताच वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत, पो.उप.नि.श्रीमती फंड यांनी घटनास्थळाला भेट देऊन या घटनेचा पंचनामा केला. यावेळी मयतांचा मुलगा याने शेतरस्त्याच्या कारणावरुन ते दोघे त्रस्त होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती प्राथमिक तपास निष्पन्न झाल्याचे पोलीस निरिक्षक सुरेश बुधवंत यांनी एकमतशी बोलताना सांगितली.

उघडे दाम्पत्याच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा आहे. यापैकी एका मुलीचा विवाह झाला आहे. तर एक मुलगी बार्शी येथे शिक्षण घेत आहे. तर मुलगा परंडा येथे शिक्षण घेत आहे. या घटनेमुळे दसमेगावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या