28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसोलापूरदुचाकी चोरणारी सात जणांची टोळी गजाआड

दुचाकी चोरणारी सात जणांची टोळी गजाआड

एकमत ऑनलाईन

सांगोला : पोलिसांनी एका मोटारसायकलच्या गुन्ह्यात एका तरुणाला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यातून सात जणांची टोळीच सापडली. त्यांच्याकडून चोरीतील पाच दुचाकी, तीन टेम्पो, ३.५ टन स्टील, केबल वायर, पानबुडी मोटार, वेल्डिंग मशीन, ग्राइंडर, कटर आदी सुमारे २५ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दुचाकी, चारचाकी वाहन, केबल वायर, इलेक्ट्रिक मोटार बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळई अशा चोरीच्या घटना घडल्या होत्या. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चोरीच्या घटनांचा तपास करून उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गणेश भीमराव शिंदे (वय २४, रा. मस्के कॉलनी) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असताना सात जणांची टोळी असल्याची माहिती समोर आली.

त्यानंतर सचिन बाळासाहेब दिघे (वय ३०), स्वप्नील बापू ऐवळे (वय २६) व अतुल श्रीकांत चंदनशिवे (वय ३०, तिघेही रा. वासूद, ता. सांगोला), सचिन उर्फ बिया दादासो ऐवळे (रा. पंढरपूर रोड, सांगोला), खंडू नामदेव चव्हाण (वय २२, रा. मणेरी गल्ली, सांगोला) व महेश सुरेश वाघमारे (वय २२, रा. भोकरे वस्ती, सांगोला) यांना पकडल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या