सोलापूर : कामावर गेलेल्या एका ४० वर्षीय मजुराने कारखान्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गांधीनगर येथील राठी कारखान्यात सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.
राजेंद्र उर्फ किरण रमेश गजम (वय ४० रा. गांधीनगर अक्कलकोट रोड) असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. तो राठी यांच्या कारखान्यात काम करीत होता. सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. दहा वाजेच्या सुमारास कारखान्यातील वरच्या खोलीत त्याने छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णाला दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला.
मयत गज्जम याच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.