सोलापूर : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात समोर आला आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या मृत्यूने झाला आहे. दोघांमधले प्रेमप्रकरण संपुष्टात आले होते. मात्र त्यानंतरही प्रियकर विवाहित प्रेयसीची पाठ सोडत नव्हता. त्यामुळे प्रेयसीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.
जुना विडी घरकुल येथे राहणा-या कविता कल्याणम या विवाहितेने प्रियकराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कविता कल्याणम हिचे तिच्याच जवळपास राहणा-या संदीप राठोड याच्याशी प्रेमसूत जुळले होते. मात्र सदरची बाब कविता कल्याणम हिच्या पतीला कळल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला समज देत अशी घटना पुन्हा होऊ नये अशी ताकीद दिली होती. त्यानंतर दोघातील प्रेम प्रकरण संपुष्टात आले होते. मात्र प्रियकर संदीप राठोड हा कविता कल्याणम हिची पाठ सोडत नव्हता.
संदीप राठोड वारंवार कविता कल्याणमला त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून कविता कल्याणम हिने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.