23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसोलापूरसव्वा कोटी रुपयांची फसवणूक; आरोपीस सात वर्षांची सक्तमजुरी

सव्वा कोटी रुपयांची फसवणूक; आरोपीस सात वर्षांची सक्तमजुरी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : जुन्या गाड्या घेऊन त्या गाड्या जास्त दरात विकून फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सोलापूरच्या फिर्यादी अनिल भाकरे (रा. सोलापूर) यांच्यासह दहा जणांची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोप सचिन रामचंद्र गडदे (रा. दमाणीनगर) याला सात वर्षे सक्तमजुरी व ५० हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी की, आरोपी सचिन गडदे याने फिर्यादी अनिल भाकरे यांना श्रीराम फायनान्समध्ये कर्ज न फेडलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्या ओढून आल्यानंतर त्यांचा ज्यावेळी लिलाव होतो. त्यावेळी त्या गाड्या कमी किमतीत घेऊन मी जास्त किमतीत विकतो. त्यातून मला भरपूर नफा मिळत असल्याचे सांगत फिर्यादी भाकरे व इतर नऊ जणांकडून एक कोटी एकवीस लाख बेचाळीस हजार पाचशे रुपये रक्कम घेतली. ही रक्कम व त्यावरचा मोबदला न देता त्यांची फसवणूक केली.

यात सरकारतर्फे अमर अ. डोके व आरोपीतर्फे अ‍ॅड. श्रीकांत गडदे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस नाईक ज्योती बेटकर व पोलिस शिपाई अमर शेळके यांनी अभियोग पक्षास मदत केली. याप्रकरणी एकूण १७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. याप्रकरणी सरकारी वकील अ‍ॅॅड. अमर डोके यांनी आरोपीने सामान्य लोकांची मोठ्या रकमेची खोटे बोलून फसवणूक केल्यामुळे त्याला जास्त शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद केला. फिर्यादी व साक्षीदार यांचा साक्षी पुरावा ग्रा मानून मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह आय. भंडारी यांनी शिक्षा सुनावली

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या