21.9 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeसोलापूरडॉक्टरांच्या खात्यातून सव्वा लाख रुपये काढले

डॉक्टरांच्या खात्यातून सव्वा लाख रुपये काढले

एकमत ऑनलाईन

सोलापूर : मी माजी सैनिक असून आमच्या ५० जणांचे हृदयाची तपासणी करायची आहे, असे सांगत सोलापुरातील डॉ. सत्यशाम श्रीराम तोष्णीवाल (वय ५२, रा. रेल्वे लाईन, रामलाल चौक) यांच्या बँक खात्यातील १ लाख ३० हजार रुपये अज्ञात इसमाने काढून त्यांची फसवणूक केली. याबाबत त्यांनी सदर बाजार पोलिसांना फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी डॉ. सत्यशाम तोष्णीवाल यांना काही दिवसापूर्वी अज्ञात इसमाने
त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठवला. त्यात त्याने आपण माजी सैनिक असल्याचे सांगत आपल्या ५० जणांची हृदयाची तपासणी करायची आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर समोरील इसमाने व्हिडिओ कॉल करून यूपीआयचे खाते उघडण्यास सांगत आपल्याला शंभर रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानंतर डॉ. तोष्णीवाल यांनी त्या इसमाच्या मोबाईल नंबरवर १०० रुपये पाठवले. त्यानंतर तोष्णीवाल यांच्या खात्यावर दोनशे रुपये पाठवल्याचे त्या इसमाने सांगितले. ही रक्कम आली आहे, असे सांगत असतानाच डॉ. तोष्णीवाल यांच्या दुसऱ्या बँकेच्या खात्यातून एक लाख तीस हजार रुपये कट झाल्याचा संदेश त्यांना आला.

त्यासाठी त्यांनी कोणताही ओटीपी दिलेला नव्हता. पण तरीही पैसे कट झाले. त्यामुळे लागलीच त्यांनी आलेल्या नंबरवर फोन केला असता समोरील व्यक्तीचा फोन बंद लागला. यामुळे त्यांनी लगेच सायबर विभागाकडे या घटनेची तक्रार दिली. त्यानंतर याबाबत रविवारी सदर बाजार ठाण्यात दोन मोबाईलधारकावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक पोपटराव धायतोंडे हे करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या