कुर्डुवाडी : कुर्डुवाडी येथील गांधी चौकातील दर्शन ज्वेलर्स या दुकानचे चॅनल गेट, शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ८५ हजारांच्या चांदीच्या वस्तूसह नऊ हजार रुपयाचा सीसीटीव्ही कॅमेरा मशीन ही चोरट्यांनी पळवले आहे. याबाबत फिर्याद दर्शन सुरेंद्र देवी (वय ३७ रा. कुर्डुवाडी) यांनी पोलिसांत दिली आहे. ही घटना दि. २५ जलै रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली.
दर्शन देवी यांचे वडील सुरेंद्र देवी दुकानात आले असताना दुकानाची कुलपे तोडल्याचे लक्षात आले. मुख्य बाजारपेठेतील दुकानात सराफ चोरट्यांनी डल्ला मारल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. तेही येथील जुन्या करंदीकर वाड्यापर्यंत जाऊन घुटमळले. त्यापाठोपाठ फिंगर प्रिंट पथक आले. व तपासणी केली.
दुपारी ४ च्या दरम्यान सोलापूर गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक नागनाथ खुणे व पथकानेही घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, श्वान पथक येणार असल्याने दुकानात जाऊ नये असे पोलिसांनी फिर्यादीस सूचना दिल्या होत्या. त्यामुळे प्रथमदर्शी ६९ हजारांची चोरी फिर्याद नोंद झाली. मात्र दुकान तपासणीनंतर पैंजण बॉक्स अंदाजे १ लाख ८५ हजार रुपयाचा मालही पळवल्याचे लक्षात आले. पुढील तपास पोलिस हवालदार वादगे करत आहेत.