24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeसोलापूरशेतातील शोषखड्ड्यात पडल्याने तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

शेतातील शोषखड्ड्यात पडल्याने तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शोषखड्ड्यात पडून एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. राजेश्वरी सूर्यकांत घोडके असे त्या चिमुकलीचे नाव आहे. घोडके कुटुंबीय भोगाव येथे आपल्या शेतात राहतात. आई-वडील दोघेही शेती करतात. त्यांना एक तीन वर्षांची व दुसरी पाच वर्षांची अशा मुली आहेत. त्या मार्डी येथील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळेत जात होत्या.

शनिवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे सकाळी राजेश्वरी घराबाहेर खेळायला निघून गेली. तिची आई घरकामामध्ये गुंतलेली होती. शिवाय ती नेहमी बहिणीसोबत खेळत बाहेर असल्यामुळे काही वेळ कोणीच लक्ष दिले नाही. अकरा वाजून गेल्यानंतरही ती घरी आली नाही आणि घराजवळ दिसत नसल्याने सर्वत्र हुडकले. मात्र, ती कुठेच मिळून आली नाही. तिचे आई-वडील, आजी शेजारचे सर्वच लोक तिला हुडकत होते शेजारच्या शेतामध्ये असलेल्या शोषखड्ड्यात तरी पडली नसेल ना म्हणून पाहायला गेले, तेव्हा त्या ठिकाणी चिखलात लहान मुलाच्या पाऊलखुणा दिसल्या. खड्ड्यातील पाण्यात शोधल्यानंतर तिचा मृतदेह सापडला. सिव्हिल हॉस्पिटल येथे शवविच्छेदन करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत तालुका पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या