मोहोळ (राजेश शिंदे) : कुरुल रस्त्यावर शंकर मुसळे यांच्या हॉटेल वैष्णवी जवळ केमिकल टँकरची व मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या गाडीची समोरासमोर सकाळी साडेदहाच्या सुमारास जोराची भीषण धडक झाली. मोहोळ- कुरुल रस्त्यावर शंकर मुसळे यांच्या हॉटेल वैष्णवी जवळ केमिकल टँकरची व मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या गाडीची समोरासमोर सकाळी साडेदहाच्या सुमारास जोराची भीषण धडक झाली.
या झालेल्या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांना आग लागली असून दोन्ही गाड्या जळून खाक होत आहेत . सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. यावेळी घटनास्थळी पोलिस निरीक्षक अशोक सायकर , पोलिस कर्मचारी निलेश देशमुख व पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ भेट देत परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला . ही आग विझवण्यासाठी लोकनेते साखर कारखाना अनगरचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले असून आसपासच्या परिसरास आगीची इजा पोहचू नये , यासाठी घटनास्थळी उभे आहे.
केमिकल टॅकरमधील चालकाला शरद गाढवे , महादेव गाढवे , रूषीकेश माने , शंकर मुसळे यांनी गाडीचा दरवाजा कुराडीने तोडून चालकाला बाहेर काढत चालकाचा जीव वाचविला . सुमारे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली असून विजयपुर महामार्गाच्या गाड्याच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत .
सकाळी दहा वाजता धडक झाली मी स्वतः मोहोळ पोलिस स्टेशनला फोन केला पोलीस स्टेशनची गाडी आली नाही म्हणून मी एकदा सोडून तीन वेळा फोन करूनही मोहोळ पोलीस स्टेशनची गाडी येण्यास पूर्ण एक तास विलंब झाला मोहोळ पोलिस स्टेशनचे घटनास्थळ दोन किलोमीटरचे अंतर असून जर येण्यास तास लागत असेल तर ?यामुळे आगीचा भडका जास्तच उडाला आणि दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाची गाडी दोन तासानंतर घटनास्थळी दाखल झाली . मोहोळ नगरपरिषद स्थापन होऊन पाच वर्षे पूर्ण होऊन सुद्धा मोहोळ नगर परिषद यांनी अग्निशामक ची गाडी घेतली नाही. पाच वर्षांमध्ये कमीत कमी सात घटना घडल्या असून अग्निशामक गाडी घेण्यासाठी वारंवार मोहोळ मधील व्यापाऱ्याकडून आणि नागरिकाकडून मागणी करूनही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन.के. पाटील यांच्याकडून योग्य ते उत्तर दिले जात नाही. मोहोळ नगर परिषदेची अग्निशामक गाडी असती तर तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसते.
शंकर मुसळे प्रत्यक्षदर्शी हॉटेल वैष्णवी मालक
सहा ट्रॅक्टर घाण, कचरा बाहेर काढला