सोलापूर : मंडप साहित्य घेऊन निघालेली ट्रॉली उलटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पंधरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. गणेश अंबादास मादगुंडी (वय १५, रा. लक्ष्मीनगर, विनायकनगरजवळ) असे त्याचे नाव आहे.
हा प्रकार शनिवारी सकाळी दहाच्या सुमाराला घडला, गणेश रस्त्याच्या कडेला थांबला होता. त्यावेळी ट्रॉली घेऊन मोहन मरेगुल हा मंडप साहित्य घेऊन जात होता त्यावेळी ट्रॉली उलटल्याने गणेश याच्या अंगावर साहित्य पडल्यामुळे तो जखमी झाला. शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच मरण पावल्याचे सांगण्यात आले.