सांगोला (विकास गंगणे) : सार्वजनिक बांधकाम विभाग अपघात घडल्यानंतर विहीर बुजवणार का ? रोडवरून प्रवास करणा-या नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया ! आलेगाव ते मेडशिंगी या रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला गेल्या अनेक वर्षापूर्वीची जुनी विहीर असून रात्र अपरात्री या विहिरीत अनेकदा छोटे मोठे अपघात घडतात.
हा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने या ठिकाणी दोन वाहने पास होताना साईटपट्टी वरुन वाहन घसरुन विहिरीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदरच्या धोकादायक असणारी विहीरच्या साईटवर संरक्षक भिंत नाही. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना जिव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. सदरची धोकादायक विहीर बुजवावी किंवा या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी यासाठी वारंवार तक्रारी केल्या परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग या धोकादायक विहिरीकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही.
त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणारे नागरिकांचा अपघात घडल्यानंतर बांधकाम विभाग लक्ष देणार का ? अश्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून या धोकादायक विहिरीबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
कुंडलवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर