23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeसोलापूरचंद्रभागेच्या पात्रात महिलेची सहा तास मृत्यूशी झुंज

चंद्रभागेच्या पात्रात महिलेची सहा तास मृत्यूशी झुंज

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात चंद्रभागेत स्रान व विठ्ठल दर्शनासाठी आलेली महिला भाविक सौ.कांता नारायण भुते वय ५२ वर्षे (रा. खामगाव तालुका हिंगणघाट (जिल्हा वर्धा) या चंद्रभागेच्या पात्रावर असलेल्या दगडी पुलावरुन सायंकाळी सहाच्या सुमारास पाण्यात पडल्या परंतु पोहता येत नसल्याने व पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांनी दगडी पुलाच्या तेथेच पाण्यात असलेल्या दगडाला पकडून सुमारे सहा तास मृत्यूशी झुंज देत होते.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक वर्षापासून विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. मात्र प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे एसटी बस सुरू झाली आणि वारी पोहोच करण्यासाठी वारकरी पंढरीत येऊ लागले. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी व वारी पोहोच करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील महिला भाविक पंढरपुरात आल्या त्यांनी विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन घेतले व चंद्रभागेत स्रान करण्यासाठी चंद्रभागेकडे आल्या याठिकाणी जुना दगडी पूल आहे. या पुलावरून चालत असतानाच त्यांचा तोल जाऊन ते पाण्यामध्ये पडल्या. पाण्याची खोली व पोहता येत नसल्याने तेथेच असलेल्या दगडाला त्या धरून बसल्या व मदतीसाठी सायंकाळच्या सहा वाजल्यापासून आवाज देत होत्या परंतु त्यांचे आवाज कोणीही ऐकलं नाही त्यांनी पांडुरंगाचा धावा सुरू केला.

आणि रात्री एकच्या दरम्यान कोळी समाजातील कृष्णा नेहतराव हे आपल्या शेतामध्ये पाणी देण्यासाठी दगडी पुलावरून जात असताना त्यांना एका स्त्रीचा मदतीसाठी ओरडत असलेला आवाज आला. त्यांनी गाडी थांबवली आणि आवाज नेमका कुठून येतोय हे पाहू लागली परंतु आवाज येत होते आणि तेथे परिसरात कोणीच दिसत नव्हते तेव्हा आपला मित्र किरण यास फोन करून बोलावून घेतले व दोघांनी आवाज कुठून येत आहे. याचा शोध सुरू केला तेव्हा दगडी पुला खालच्या बाजूला दगडाला धरून बसलेले एका स्त्रीचा आवाज येत होता. त्या ठिकाणी जाण्यासाठी दोघांचेही धाडस होत नव्हते अखेर सामाजिक बांधिलकीची जाणीव होऊन दोघांनी काळजावर दगड ठेवत घाबरतच आवाजाच्या ठिकाणी मोबाईलची बॅटरी लावून बघितले असता एक महिला मला वाचवा मला वाचवा असा आवाज देत होती.

दरम्यान दोघांनी आपल्या मित्रांना बोलावून घेतले व सर्वांनी मिळून सदर महिलेला पाण्यातून बाहेर काढत पुलाच्या वर आणले. यावेळी महिलेला पाण्यात कसे पडला असे विचारले असता त्यांनी सांगितले की मी सात वाजण्याच्या सुमारास पाण्यात पडली आहे. तेव्हापासून आवाज देत आहे. परंतु कोणीही मदतीसाठी आले नाही. मी खूप मोठ्याने ओरडत होते. परंतु जीव वाचवण्यासाठी कोणी येत नसल्याने बा विठ्ठला पांडुरंगा तूच आता माझी रक्षा कर व माझा जीव वाचवा असा धावा करू लागले असताना बाळांनो आपण पांडुरंगाच्या रूपात येऊन माझा जीव वाचवला आहे. आपल्यासारख्या पांडुरंगाचे आभार मी कधीही विसरू शकणार नाही अशी प्रतिक्रिया देताना महिलेच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. सदरची घटना परिसरातील नागरिकांना समजताच महिलेचे जीव वाचवणारे कृष्णा नेहतराव, किरण, लालू मंजुळे, अक्षय जाधव, शाहू साठे ,दीपक कदम, रोहन कोळी, गोलू जाधव या सर्वांचे नागरिकांनी आभार मानले.

पिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या