24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसोलापूरहात पाय धुताना तलावात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू

हात पाय धुताना तलावात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : मित्रासोबत फिरायला गेल्यानंतर तलावात हात पाय धुताना पाण्यात बुडाल्याने १९ वर्षीय तरुण मरण पावला. ही घटना तळेहिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) येथे रविवारी (ता.७) दुपारच्या सुमारास घडली.

दिनेश लिंबाजी खार्वे (वय १९ रा.कुमठा नाका,सोलापूर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो आज मित्रांसोबत हिप्परगा तलाव येते फिरायला गेला होता. दुपारी २ वाजेच्या सुमारास तो काठावर बसून तो हात पाय धुत होता. त्यावेळी अचानक पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला. शोधाशोध केल्यानंतर त्याचा मृतदेह सायंकाळच्या सुमारास आढळून आला. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. मयत दिनेश खार्वे हा शिक्षण घेत होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या