22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeसोलापूरतरूणाला मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

तरूणाला मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

सोलापूर : पान दुकान बंद करून दुकानातील सिगरेट व पैसे घेऊन जात असताना दुचाकीवरून आपल्याला मार्केट यार्डपर्यंत सोड असे म्हणत, दमदाटी करत तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मोहम्मद इरफान अब्दुलरजाक शेख (वय ४४, रा. केकडेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

शेख हे मंगळवार बाजार पेठ येथील पानाचे दुकान बंद करून दुकानातील चार हजार रुपये किमतीचे सिगरेट आणि रोख रक्कम घरी घेऊन जात असताना आरोपी शाहरुख इसाक तांबोळी (रा. गंगाई, केकडेनगर) याने आपल्याला मार्केट यार्डपर्यंत सोड असे म्हणाला.

त्याला सोडण्यास फिर्यादी शेख यांनी नकार दिल्यानंतर आरोपीने फिर्यादीची मोटारसायकल चावी मोबाईल व सिगरेट पाकिटे असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेतले. यामुळे फिर्यादीने त्याला मार्केट यार्डपर्यंत सोडण्यास होकार दिला. मार्केट यार्ड परिसरात गेल्यानंतर पुन्हा मंगळवार बाजार येथे आणत त्यावेळी तेथे त्याने व त्याच्या साथीदाराने मिळून फिर्यादीला हाताने व बेल्टने मारहाण करत फिर्यादीच्या जवळील पिशवी व त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

तिथून हाकलून दिले, अशा आशयाची फिर्याद शेख याने दिली आहे. या फिर्यादीवरून शाहरुख तांबोळी व त्याचा अनोळखी साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या